अंबड, परतूर, भोकरदन नगर परिषद अध्यक्षपदासाठी महिलांचे वर्चस्व; अंबडमध्ये भाजपकडून जल्लोषाचा उत्सव* महिलांच्या नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरूवात.... जालना, दि. 6 ऑक्टोबर — जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या नगर परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षण सोडतीत महिलांचा दबदबा स्पष्ट दिसून आला आहे. अंबड नगर परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी, परतूरचे अध्यक्षपद अनुसूचित जाती (SC) महिला तर भोकरदनचे अध्यक्षपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित ठरले