Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज दिनांक 22 ऑगस्ट दुपारी तीन वाजता शहरातील सेंट्रल नका परिसरातील शिवनेरी कॉलनी येथे स्टेज टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जबर हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये एकमेकांवरती चाकूने वार करण्यात आले ज्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शहरातील एमजीएम या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तीन जणांपैकी एक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मात्र या घटनेमुळे एमजीएम परिसरामध्ये छावणीचे स्वरूप पाहायला मिळाले आहे. एन सेवन पोलीस ठाण्याचे कर्मचारी