आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील राजुर जाफराबाद या मुख्य महामार्गावर गाडेगव्हाण या गावाजवळ भरदा कारणे एका पदाचाराला धडक देत पळून जाण्याच्या मार्गात गडबडीत विहिरीत जाऊन कोसळली आहे, यामध्ये कार मध्ये असलेले 5 प्रवासी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून एकाचा मृतदेह वर काढण्यात आला आहे उर्वरित बचाव कार्य पोलिसांकडून सध्या सुरू असल्याची माहिती डॉक्टर नितीन कटेकर डी वाय एस पी भोकरदन यांनी दिली आहे.