नळपाडा येथे विकासक संजय पांडेकडून सुरू असलेल्या बायोमेट्रिक सर्वेला स्थानिकांनी सुरवातीपासून विरोध केला आहे. येथील नागरिकांनी एसआरए कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. तसेच विकासक गुंडांमार्फत सर्वे करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या संदर्भातला सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आले होते. मात्र आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए कार्यालयात भेट दिली आहे. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले पाहायला मिळाले.