आदिवासी आरक्षणावर घाला घालण्याच्या प्रयत्नांविरोधात आणि बंजारा समाजासह काही इतर समाज अनुसूचित जमातींमध्ये घुसखोरी करून आरक्षण मिळवण्याच्या गैरसंवैधानिक मागण्यांचा निषेध करण्यासाठी पुसदमध्ये दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे 11 वाजता काढण्यात आलेल्या उलगुलान मोर्चात तब्बल एक लाख आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला.