आज दिनांक 23 ऑगस्ट दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील नीलम चौक येथे कार उभी केल्याने मोठी ट्राफिक जाम झाली होती सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय बापू मुंडे हे सदरील ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेले असता आरोपी व पोलिसांमध्ये वाद झाल्याने त्यांना पोलीस ठाणे येथे घेऊन आले असता वाद विकोपाला जाऊन चक्क पीएसआय यांना चार आरोपींनी मारहाण केल्याची घटना घडली आहे