कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या मागील प्रवेशद्वारा जवळ ३१ ऑगस्ट रोजी दोन गटामध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली. अचानक झालेल्या या भांडणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळासाठी नागरिकांची मोठी गर्दी होऊन पळापळ देखील झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बाराहाते, राहुल कुऱ्हाडे, निलेश उर्फ नल्या पवार, राहुल शिरसाठ , वैभव कुऱ्हाडे, संकेत भालेराव, विशाल सोनवणे आणि अमोल रोहिदास कोल्हे (सर्व रा. कोपरगाव) या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आ