यवतमाळ जिल्ह्यात काल गुरुवार दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने काल व आज असे दोन दिवस यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. आज सकाळपासून उमरखेड, महागाव या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे.आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत उमरखेड तालुक्यात ७८ मिमी पावसाची नोंद झाली. तर, महागाव तालुक्यात ३८ मिमी पावसाची नोंद झाली. या दोन्ही तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.