मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातिवली येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पर्यायी मार्गावर देखील मोठमोठाले खड्डे पडले आहेत. दरम्यान पावसामुळे या ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले व वाहतूक कोंडी निर्माण झाली व वाहतूक ठप्प झाली. साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना मार्ग काढावा लागला. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. दरम्यान प्रशासनाने लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.