हिंजवडी फेज 3 येथील मेगापॉलीस सॅफरॉन परिसरातील रस्त्यांची चिखलामुळे अतिशय दूरवस्था झाली आहे. यामुळे याठिकाणी छोटे-मोठे असे अनेक अपघात घडले आहेत. येथील नागरीकांनी पीएमआरडीए, एमआयडीसी आदी आस्थापनांकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु तरीही हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही.