सौंदड येथे ग्रामपंचायत कार्यालय व श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित रावण दहन व दसरा उत्सव या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी या कार्यक्रमाला वर्षा शहारे पंचायत समिती सदस्य, हर्ष मोदी सरपंच, राजकुमार शर्मा, गौरेश बावनकर, संदीप मोदी, सदुभाऊ विठ्ठले, चरणदास शहारे, श्यामसुंदर अग्रवाल, रंजना भोई तसेच इतर मान्यवर आणि खुप मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.