के. बी. टी. इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक येथे मविप्रच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने त्रिरश्मी फेलोशिप व नालंदा शिष्यवृत्ती वितरण समारंभ संपन्न झाला. मविप्रच्या मोहपाडा आश्रमशाळेचा विद्यार्थी कु. देवेश जाधव यास नालंदा स्कॉलरशिप तर उपक्रमशील शिक्षक नामदेव वाजे यांना त्रिरश्मी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. मविप्रच्या माजी विद्यार्थी संघटनेने देवेशचे पुढील पाच वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. मोहपाडा ते नाशिक या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात झाली.