सुखकर्ता दुखहर्ता म्हणून ओळख असणाऱ्या गणेशजींची गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भंडारा येथील सनिज स्प्रिंग डेल विद्यालयात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालय प्रशासन व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात गणेश मूर्तीचे आगमन केले. ढोल - ताशा सह लेझीमच्या पथकाने गणरायांच्या मूर्तीचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.