"सरकार सकारात्मक, पण जरांगे पाटलांचा गैरसमज – विखेंचं स्पष्टीकरण" मराठा आरक्षण आंदोलनाबाबत सरकार सकारात्मक आहे, परंतु मनोज जरांगे पाटलांचा काही गैरसमज झाल्याचे समिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. नगर जिल्ह्यातून जाताना जरांगे पाटलांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे ते म्हणाले. चर्चा झाली तरी निष्पन्न न झाल्यास उपयोग नाही, असेही विखे पाटील यांनी सांगितले. आंदोलनाच्या परवानगीबाबत न्यायालयाचा निर्णयच अंतिम आहे