संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा बुद्रुक येथे ७ सप्टेंबर रोजी शेतातून परतणाऱ्या ३५ वर्षीय युवकाचा वाण नदीपात्रात पाय घसरून मृत्यू झाला. मृतक युवकाचे नाव सिद्धार्थ रामदास भिलंगे असे आहे.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.