खैरी वलमाझरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.10 सप्टेंबरला दुपारी3वाजता करण्यात आले. या कार्यशाळेला मा.सरपंच,तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका,समूह संसाधन व्यक्ती,बचत गट सदस्य, गावातील सेवाभावी संस्था पदाधिकारी,गावकरी,युवक उपस्थित होते.राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता अभियानात गावाला पारितोषिक मिळावे यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच पुरूषोत्तम यांनी केले