आज दिनांक 13 सप्टेंबर सकाळी 11 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींविषयी काँग्रेस पक्षाच्या वतीने गलिच्छ भाषा वापरत, शिवीगाळ करणे तसेच AI च्या माध्यमातून अपमानास्पद चित्रफिती तयार केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. बिहार निवडणुकीचा संदर्भ देत मातृशक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा आरोप करणे, काँग्रेसच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात भाजपकडून निदर्शने करण्यात आली.