कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेचा एक नवीन अध्याय लिहिताना, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने कोनसरी गावातील १९ महिलांना आपल्या कुशल कार्यबलात सामील केले आहे. हलके मोटार वाहन चालविण्याचे एलएमईएल-प्रायोजित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता ह्या महिलांना कंपनीत नोकरी मिळाली आहे. ह्याच वर्षी जूनमध्ये, एलएमईएलने कोनसरी गावातील १९ महिलांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलँडच्या प्रशिक्षण केंद्रात हलके मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.