13 सप्टेंबरला दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार ऑपरेशन यु टर्न अंतर्गत नो एन्ट्री पॉइंटवर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक संशयित वाहन येताना दिसले. त्यांनी वाहन चालक व त्यावर स्वार असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. यादरम्यान पोलिसांनी तपास केला असता आरोपी सुभाष शिलू वय एकोणवीस वर्ष राहणार चौरे पठार जिल्हा छिंदवाडा याने त्या अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीचे अपहरण करून आणले असल्याचे उघडकीस आले.