सुमारे एक हजार वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पवित्र ज्योतिर्लिंगाची समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महारुद्र पूजा आयोजित करण्यात आली आहे. आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक, आध्यात्मिक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात ४०,००० हून अधिक भक्त प्रत्यक्ष सहभागी झाले. तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते.