अक्कलकुवा शहरातील जामीया शिक्षण संस्थेची इंग्लिश मीडियम शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेत शिवारात बिबट्याचे मुक्त संचार होत आहे. शेतमालक हाजी शरीफ बलोच यांच्या शेतातील रखवालदार मोत्या पाडवी यांच्या घरातून दि. 29 रात्रि 11 ते 30 अगस्त सकाळी 5 वाजेच्या दरम्यान शेळीला फरफटकांना नेण्याची घटना घडली आहे. वन विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.