अमेरिकेने भारतीय शेती माल ऊस, साखर, सोयाबीन, कापूस उत्पादनावर 25 टक्के हा अन्यायकारक टेरिफ टॅक्स लादल्याने, भारतीय शेतकरी उध्वस्त होणार आहे, तो थांबवण्यासाठी भारत सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे अशी मागणी, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज, बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, देशातील शेतकऱ्यांचा विचार करून मोदी सरकारने टेरिफ टॅक्स रद्द करावा अशी मागणी, यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे सेक्रेटरी माणिक अवघडे यांनी केली.