सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर एका वकिलाने केलेल्या अवमानकारक कृतीचा माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा आमदार राजकुमार बडोले यांनी तीव्र निषेध केला आहे. लोकशाहीच्या चौकटीत न्यायव्यवस्था ही सर्वात पवित्र संस्था आहे, तिचा अपमान म्हणजे संविधानाचा अपमान आहे.असे आमदार राजकुमार बडोले म्हणाले.