माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त आज शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. मीनाक्षी पाटील यांच्या समाजकारण, विशेषतः ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत, जनसेवेस कटिबद्ध राहणं, हीच जयंतीनिमित्त त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे देखील खासदार सुनील तटकरे म्हणाले.