संग्रामपूर तालुक्यातील वारखेड येथे 3 सप्टेंबर रोजी रात्रीचे सुमारास दोन तरुण तलवार घेवून फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी जावून दोघा तरुणांना ताब्यात घेवून त्यांच्या जवळील धारदार तलवार जप्त केली.याप्रकरणी पोलीस शिपाई कैलास सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहन गोपाल नटोकार व सागर एकनाथ नटोकार विरुद्ध सोनाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.