मागील चार-पाच दिवसांपासून मुंबईला आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या संदर्भात न्यायालयाने आपल्या काही सूचना त्या ठिकाणी दिले होत्या. ज्यांचे पालन आंदोलकांकडून त्या ठिकाणी पूर्णपणे होत नाही आहे परंतु सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतली. वारंवार आम्ही देखील आंदोलकांना विनंती केली आहे की कायदा व सुव्यवस्था बाधित न होता त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांनी आंदोलन करावे. असे मत पालकमंत्री पंकज भोयर यांनी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता केले.