सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांना होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासावर आळा बसवण्यासाठी एस एस व्ही पी एस कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. या विद्यार्थ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृती करणारे एक प्रभावी पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.