आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. १४% आरक्षण दिलं, मराठा आर्थिक विकास महामंडळाचं पुनर्जीवन केलं. पण उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचं आरक्षण गेलं. त्यामुळे आरक्षणाचं पाप ठाकरेंचं आहे. संजय राऊत यांनी सामनामध्ये मराठा मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणत व्यंगचित्र काढलं होतं. आमच्या मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या संजय राऊत यांची आरक्षणावर बोलण्याची पात्रता नाही, अशी मागणी आज गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली.