Download Now Banner

This browser does not support the video element.

खुलताबाद: वेरूळ परिसरातील पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची तातडीची भरपाईची मागणी

Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 23, 2025
वेरूळ व खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टीमुळे धोक्यात आले आहेत.सतत सुरू असलेल्या पावसामुळे कसाबखेडा, मंबापुर, पळसवाडी, तलाववाडी, शादुलवाडी, शेकापुरी, तिसगाव, निरगुडी, पिंपरी, पळसगाव, आखातवाडा येथील मका, सोयाबीन व कापूस यांचे मोठे नुकसान झाले आहे.सूर्यदर्शन न झाल्याने पिकांची पाने पिवळी पडत असून करपा व अळी रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.शेतकरी आर्थिक तंगीमुळे चिंतेत आहेत, कारण मका व सोयाबीन पिकासाठी कर्ज घेण्यात आले होते.याव्यतिरिक्त रानडुकरांनीही पिकांचे नुकसान केले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us