सांगोला तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या, तब्बल ९ नागरिकांवर घातक हल्ला केलेल्या लांडग्याचा अखेर मृत्यू झाला आहे. याबाबत सांगोला वनपरिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांनी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३च्या सुमारास संवाद साधला आहे. त्याचा मृत्यू हा रेबीज या आजारामुळे झाला आहे. तरी ज्या ठिकाणी हल्ला झाला होता, त्या शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या पशुधनांना रेबीजची लस टोचून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.