तालुक्यात ता. ३१ ला जेष्ठा गौरीचे आगमन होऊन धार्मिक वातावरण अधिक प्रसन्न झाले आहे. गावागावात भक्तिमय उत्साह दिसून येत असून, भाविकांनी सजून-धजून पारंपरिक पद्धतीने गौरीची सायंकाळी ६ वा. प्रतिष्ठापना केली. ढोल-ताशांच्या गजरात, मंगल कलश आणि वाद्यांच्या निनादात या उत्सवाला सुरुवात झाली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला असून सर्वत्र "गौरी माता की जय"च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.