मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवार ११ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मौजे भोगाव पुलावर इको कार संरक्षक भिंतीला धडकून उलटल्याने अपघात घडला. या अपघातात 1 चा जागीच मृत्यू झाला तर 3जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, लिंगाप्पा कटेप्पा पातारे (वय २९, रा. आदर्शनगर कॉलनी नं. २, दिघी, पुणे) हा आपल्या ताब्यातील इको गाडी (क्रमांक एम.एच. १४ के एस ०२३१) घेऊन मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात होता. मात्र, भोगाव पुलावर पोहोचताच भरधाव वेगात वाहनावरील नियंत्रण सुटले व अपघात झाला.