आज मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास सुतारवाडी येथील निवासस्थानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील विविध भागांतून आलेल्या कोकणवासीयांनी खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या विविध समस्या, अडचणी व प्रलंबित मागण्या तटकरे यांच्यासमोर मांडल्या. कोकणवासीयांचे जीवन सर्वांगीणदृष्ट्या अधिक सुलभ, प्रगतीशील व परिपूर्ण होण्यासाठी, त्यांच्याकडून आलेल्या प्रत्येक समस्या व त्यावरील प्रस्तावित उपाययोजना गांभीर्याने जाणून घेतल्या.