भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात नालासोपारा येथे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबाबत अपमान जनक वक्तव्य केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे नालासोपाराचे आमदार राजन नाईक, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.