कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज २१ ऑगस्ट रोजी शांतता कमिटीची बैठक पार पडली. बैठकीस पोलीस अधिकारी, नगरपरिषद प्रतिनिधी, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत डीवायएसपी अमोल भारती मंडळांना शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. ध्वनीप्रदूषण नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले.