गॅगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. कोथरुड पोलिसांनी गॅगस्टर निलेश घायवळ याच्या दोन स्कॉपिओ आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यातील एका दुचाकीला त्याने शेतकर्याच्या स्कॉपिओ गाडीची नंबर प्लेट लावल्याचे उघडकीस आले आहे. कोथरुड पोलिसांनी निलेश घायवळ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.