चंद्रपूर क्रीडा ही केवळ खेळांची गोष्ट नाही तर ती व्यक्ती महत्त्व घडवणारी शिस्त मेहनत आणि आत्मविश्वास शिकवणारी जीवन शाळा आहेत 29 ऑगस्ट रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान 200 गुणवंत खेळाडूंना सत्कार केला हे खरोखरच अभिमानास्पद आहे तुमच्यातील प्रत्येक जण चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उंचावणार आहेत खेळाडूंना आवश्यक संधी व संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मैदानाचा प्रत्येक घामाचा थेंब भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले