बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. या दिवशी चिमुकले लाकडी बैल घेऊन तोरणात जातात आणि अत्यंत उत्साहात हा पोळा साजरा करण्यात येतो. 23 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजताच्या सुमाला शहरात विविध ठिकाणी हा तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांनी विविध आकर्षक वेशभूषा धारण करत नागपूरकरांची मन जिंकली. यादरम्यान मंडळातर्फे त्यांना बक्षीस देखील देण्यात आली. अत्यंत उत्साहात हा पोळा आज साजरा करण्यात आला