जागतिक कौशल्य स्पर्धा ही दर दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. ऑलम्पिक च्या धरतीवर होणाऱ्या या स्पर्धेत 23 वर्षाखालील तरुण-तरुणी उमेदवार आपले कौशल्य सादर करतात आता जागतिक कौशल्या स्पर्धा सन 2026 मध्ये शांघाय चीन येथे होणार आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले.