रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील 10वीतील मुलाने परिक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 23 ऑगस्ट रोजी रात्री 8 वा.सुमारास घडली. रेहान असलम कापडे (15, रा.स्वामी समर्थ अपार्टमेंट बाष्टे कपाउंड उद्यमनगर, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचा मामा अश्रफ अली ईसाक पागारकर (65, रा.एमजी रोड भाजी मार्केट, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.