उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. ॲड. आशिष जयस्वाल, आणि पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे शिवसेनेचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.या सोहळ्यात विविध पक्षांतील शेकडो पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना जोरदार मोर्चेबांधणी करत आहे.