दिनांक 19 ऑगस्ट रोजी श्री सागर खरडे सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर यांच्या नेतृत्वात मौजा गोणखैरी येथे अवैधरित्या मोह फुलाची गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर छापा टाकला यामध्ये 19 आरोपीतांकडून सात लाख वीस हजार 950 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे