यवतमाळ येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी अंदाजे 4 वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना योगेश धानोरकर यांनी आगामी निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली.“येणाऱ्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद किंवा नगरपालिका अशा सर्व निवडणुकांमध्ये विशेषतः विदर्भात आणि प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात मोठे बदल झालेले दिसतील.या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे,” असे ते म्हणाले.