आज दिनांक 6 सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून यावेळेस सिल्लोड तालुक्यातील भवन गावातील पूर्णा नदी पात्रात गणेश विसर्जन साठी गणेश भक्तांनी पसंती दिली आहे यामुळे पूर्ण नदी पात्रात गणेश विसर्जनाची मोठी गर्दी दिसून आली तसेच सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली असून यासाठी सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे