भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा उमेश म्हेत्रे या तरुणाने थेट अर्ज दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नवी दिल्लीतील राज्यसभेच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज दाखल केला.