ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी उदगीर तालुक्यातील कौलखेडळ येथील सुपुत्र बापूराव राठोड यांची निवड झाल्याबद्दल उदगीर तालुक्यातील जानापूर तांडा येथे तांड्यातील नागरिकांकडून नागरी सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती ज्योतीताई राठोड,गुणाईशिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अमित राठोड, उद्धव राठोड.श्याम राठोड यांच्यासह तांड्यातील बंजारा बांधव याप्रसंगी उपस्थित होता.