आज हनुमान जयंती निमित्त कागल शहरातील बाजारपेठ येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते.आज सकाळी भाविकांच्या उपस्थितीत श्री.हनुमानाची विधिवत पूजा करण्यात आली.त्यांनतर सकाळच्या प्रसन्न वातावरणात जय हनुमानाच्या घोषाने परिसर दुमदुमून गेला. विविध मान्यवर व भाविकांनी दर्शनासाठी रीग लावली.