डॉ. ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकीन महिलांचे मानधन वाढविण्यात यावे व त्यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे. आज पक्षाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले.