मलकापूर शहरातील दसरखेड टोलवर कर्मचारी काम आटोपून घराकडे जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी सांयाकाळी घडली आहे.संचित सुरेश करे असे जखमी झालेल्या युवकांचे नाव असून सरपंच निना पाटील, अजय मेहेंगे, दिपक चव्हाण, योगेश गाढे यांनी जखमी युवकास जिल्हा उप रुग्णालयात दाखल केले.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुध्द मलकापूर एमआयडिसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.