25 ऑगस्ट ला दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील मयूर नगर येथे राहणारे बाळा खडसे हे त्यांच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील पॅराफीट वर बसले असताना त्यांचा अचानक तोल गेल्याने ते खाली पडून गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवर 28 ऑगस्टला दुपारी पाच वाजता पोलीस स्टेशन वाठोडा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे